हंगरगा ता.मुखेड चाळीस कामगारासाठी राहुलभैय्या केंद्रे ठरले संकटमोचक
हंगरगा मूखेड येथिल ४० कामगार लाॅकडाउनच्या बिकट परस्थीतीत गुजरातमध्ये अडकुन पडलेल्या कामगारासाठी लातुरचे जिल्हापरिषद अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे हे संकटमोचकच्या रुपाने धाऊन गेले.यांच्यावरिल आलेले संकट तारणारे तारणहार ठरल्यामुळे यांचे कौतुक होत आहे. या चाळिस कामगारांना घरापर्यंत पोंहचविण्यापासुन ते ऊदगीरच्या आरोग्यकेंद्रात आरोग्यतपासणी करे पर्यंत स्वत: थांबुन आस्थेवाईकपणे विचारपुस करुन त्यांना घरापर्यंत पोहंचविण्याची काळजी घेतली.त्यामुळे या कामगारासाठी राहुल भैय्या देवदूतच ठरले म्हनायला काही हरकत नाही . या कामगारांना मदत करुन यांना सुखरुप घरी पोहंचविले याच्यासाठी राहुल भैय्या केंद्रे हे संकटमोचक ठरले आहेत. भैय्यामुळेच मूखेड तालुक्यातिल हंगरगा येथिल हे चाळिस कामगार त्यांच्या घरी विनाअडथळा,विनासंकट सुखरुप पोहंचु शकले अन्यथा त्यांना रस्त्यातच राहावे लागले आसते,
हंगरगा येथिल चाळिस ते पन्नास कामगार सुरत येथिल डायमंड कंपनित कामाला होते लाॅकडाऊन झाल्यामुळे कंपनी बंद झाली तिथे राहता येईना. राहायच म्हटल तर खावे काय यामूळे ते मिळेल त्या वाहनाने गावाकडे जायचा विचार करु लागले वाहन भेटत नव्हते मग त्यांनी एक कंटेनर बघितला.कंटेनरवाला कसाबसा तयार झाला,कंटेनरमध्ये बसुन निघताना वाटेत पोलिस..... संकटावर संकट कसबस करत दहाविस कीमी नंतर राहुलभैय्याची आठवण एका कामगाराला झाली लगेच फोन लावला अन या संकटमोचकाने संकट तारले. जिल्हापरिषद अध्यक्ष राहुलभैय्यांचा गुरुवारी २६ मार्चला सायंकाळी फोन खणखणला.नंबर अनोळखी फोन उचलताच तिकडुन आवाज आला भैय्या... आम्ही हंगरग्याचे आहोत नाशिकच्या महाराष्ट्र गुजरात सिमेवर अडकलोय...,पोलिस येवू देत नाहित... आमच्या गावचे चाळिस जन आहोत.. आमच्या सोबत बाया लेकरबाळ आहेत, भैय्या ....आम्हाला मदत करा.आम्हाला घराकड जायायच आहे, पण पोलिस येवू देत नाहीत..., काही ही करा पण आम्हाला घरापर्यंत यायला मदत करा आम्ही आता महाराष्ट्र गुजरात सिमेवर आहोत भैय्या आम्हाला संकटातुन सोडवा भैय्या असा अवाज चालू होता यावेळी क्षणाचा ही विलंब न करता लगेचच प्रशासनाशी संपर्क साधुन त्यांच्यातिल अडथळे दुर करत आज घरी पोहंचविले.एवढेच नाही तर दर मिनीटाला त्यांच्याशी संपर्क साधुन त्यांची सर्व व्यवस्था केली.आज चाळीस कामगार कंटेनरमधुन उदगीरला येताच त्यांची ऊपजिल्हारुग्णालयात आरोग्य तपासणी केली गेली.तपासणीनंतर त्यांना घरापर्यंत सुखरुप पोहंचवीण्यापर्यंतच्य सारथ्य राहुलभैय्या केंद्रे यांनी केले. त्यांची काळजी घेतली त्यामूळे या *कामगारांना राहूलभैय्याच्यारुपाने संकटमोचक* भेटला.लाॅकडाऊनमध्ये कामगारावर जे संकट आले होते हे संकट तारणारे तारणहार राहूलभैय्या केंद्रे ठरले आहेत.या तारणहारामूळेच या कामगारांना सुखरुपपने घरी जाता आले.
यावेळी *कामगार म्हनाले राहुलभैय्या हे आमच्यासाठी संकटमोचक ठरले आहेत आमच्यावरील आलेले संकट तारणारे तारणहार आहेत या तारणहारामुळेच,संकटमोचकामुळेच आम्ही विना संकट सूखरुप घरी पोहंचलो* जर राहूलभैय्या आमच्या मदतीला धावुन आले नसते तर आम्ही किती दिवस रस्त्यात अडकुन पडलो असतो हे आम्हाला सांगता येत नाही अशी प्रतिक्रीया विट्ठल येनगुले ,बालाजी हूगे, अविनाश स्वामी , सुनील हूगे ,विद्यासागर वाडिकर ,किरण सचिन आयनले ,नितिन आयनले ,संतोष हूगे ,माधव आयनले ,गणेश मगड़ेवार ,लक्ष्मण थगनारे, वसुदेव नरोटे ,पंडरी शुभाने ,नारायण सगर ,रियाज शेक, रीज़क शेक आदी , कामगारातुन ऐकायला मिळत होती.