कोरोना विषाणू संसर्गा मुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व मानवता धर्माचे पालन करीत राष्ट्रीय उत्तरदायित्व पार पाडताना तन-मन-धनाने प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर, जि.लातूर यांच्या वतीने प्रधानमंत्री केअर फंडामध्ये दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
उदगीर विधानसभेचे पंधरा वर्ष व अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे पाच वर्षे महाराष्ट्र विधानसभेत प्रभावीपणे प्रतिनिधित्व करणारे व महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून सबंध महाराष्ट्रात अनेक विधायक व समाजोपयोगी कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभेत दुसर्यांदा प्रतिनिधित्व करणारे व लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी अहोरात्र झटणारे लोकाभिमुख व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आमदार तथा संस्थेचे सचिव बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी भगवानसिंह बायस गुरुजी, सकारात्मक तथा दुरदृष्टीकोनातुन नियोजनबद्ध काम करणारे संस्थेचे सहसचिव अविनाश जाधव आणि संचालक मंडळातील अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वतीने सदरील निधी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करून खात्यात जमा झालेल्या चेकची व पावतीची सत्यप्रत उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रुग्णालय अधीक्षक डॉ.दत्तात्रय विनायकराव पाटील यांनी सुपूर्द केली.