लातूर,दि.15:- कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे. समाज कल्याण विभाग जि.प. लातूर यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
या कालावधीत जिल्हा दिव्यांग कल्याण निधीतून 160 अतितिव्र दिव्यांग मुलांच्या पालकांना प्रत्येकी 6 हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आलेले असून रुपये 9 लाख 60 हजार निधीचे वितरण करण्यात आलेले आहे. या कालावधीत कोणत्याही दिव्यांग मुलांची उपासमार होणार नाही याची खात्री अतितिव्र दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण आधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.
अतितिव्र दिव्यांग मुलांच्या पालकांना प्रत्येकी सहा हजार रुपये अर्थसहाय्य