सैनिकी विद्यालयाचे विद्यार्थी घेत आहेत ऑनलाईन धडे.

 


 श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाचे विद्यार्थी लाॅकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन धडे घेत आहेत .


जगात कोरोना या आजाराने हाहाकार  पसरला असल्यामुळे संपूर्ण भारत लॉक डाऊन आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत .


या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून  कमांडंट  कमांडर बी के सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे द्यावेत हा उपक्रम समोर ठेवला .याला संस्थेचे अध्यक्ष बसवराज म पाटील नागराळकर, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिली.


 दिनांक 13 एप्रिल ते १५ जून 2020 पर्यंत मोबाईल द्वारे ऑनलाइन धडे देण्यासाठी नियोजन करण्यात आले. दररोज एक विषय अभ्यासासाठी ठरवून देण्यात आला. सोमवार ते शनिवार पर्यंत दररोज एक विषय ठरवून देण्यात आला तर दर रविवारी मुलांच्या शंकांचे निरसन व एक परीक्षा अशी तयारी करण्यात आली .


आपल्या विषयाचे शिक्षक दररोज आपल्या विषयाबद्दलची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर ठेवत आहेत .विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे .या उपक्रमाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.


 हा उपक्रम सुरू केल्याबद्दल कमांडंट कमांडर बी के सिंह,प्राचार्य वसंत कुलकर्णी व सर्वच शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म .पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, चंदन पाटील नागराळकर यांनी केले आहे.