मा. बसवराज म.पाटील नागराळकर यांच्या तर्फे गरजुंना अन्नधान्याचे वाटप.
उदगीर,
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मा.बसवराज म.पाटील नागराळकर ,सरचिटणीस ,राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या तर्फे गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे .कोरोनाचा हाहाकार जगभरात पसरला आहे.सर्वच उद्योगधंदे,व्यवसाय ,रोजगार बंद आहेत.त्यामुळे मजुर,कामगार, गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मा.बसवराज म. पाटील नागराळकर ,सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तर्फे उदगीर शहरातील हजारो मजुर ,कामगार,गरजू व्यक्तींना सोशल डिस्टन्स याचा वापर करत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.अन्नधान्याचे वाटप करताना यावेळी हात धुण्यासाठी हँडवॉश व साबणाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी अन्नधान्य वाटप करताना दिलीप पाटील नागराळकर ,चंदन पाटील नागराळकर ,जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस,चेतन पाटील नागराळकर ,कमांडंट कमांडर बी के सिंह ,प्राचार्य वसंत कुलकणी,अरविंद अकनगीरे, मैनोद्दीन सय्यद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.