कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोणी ग्रामपंचायतनी केला "नाकाबंदी" रस्ता बंद
उदगीर (प्रतिनिधी)उदगीर तालुक्यातील लोणी येथील कोरोना विषाणु चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोणी ग्रामपंचायत आंर्तगत येणार्या मूख्य रस्त्यावर नाकाबंदी केली जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये व विविध गावपातळीवर अनेक उपाय योजना केल्या जात आहेत त्या उपाय योजनेमध्ये लोणी ग्रामपंचायत अग्रेसर असून गावामध्ये सकाळ-दुपार-संध्याकाळ मंदिरावरील स्पीकरवर लोकांना विनंती करण्यात येत आहे लॉक डाऊन तोडू नये म्हणून पुन्हा पुन्हा सांगण्यात येत आहे गाव स्वच्छ नाली स्वच्छ व फवारणी करून गावामध्ये गहाण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे याचाच एक भाग म्हणून लोणी गावांमध्ये अनेक गावातून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत होती म्हणून गावामध्ये येणाऱ्या वाहनांची चौकशी करून मगच वाहन सोडले जात आहे त्या वाहनाची नोंद करून ते वाहन पुन्हा येणार नाही याची त्यांना सूचना देण्यात येत आहे तसेच बाहेर गावातून आलेल्या लोकांची तपासणी येथील आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी करूनच त्यांना 14 दिवस बाहेर न निघण्याचा सल्ला देऊन घरामध्ये बसण्यास सांगण्यात आलेले आहे आज सकाळपासून ये जा करणाऱ्या वाहनांची ची तपासणी करण्यात आली व त्यांना समज देऊन पुन्हा न येण्याचे सांगण्यात आले यामुळे कोरोणा विषाणू चा प्रार्दुभाव रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे यासाठी लोणी ग्रामपंचायतचे सरपंच माधव पाटील उपसरपंच सोपान फड ग्रामपंचायत सदस्य गणीसाब शेख पूरन दास उदासी गणेश पटवारी नरसिंग कांबळे सतीश पाटील दिलीप गुलफुले तिरूपती साताळे अशोक भुजबळे ज्ञानोबा लोणीकर मुख्याध्यापक संजय वाघमारे साधुराम कांबळे राजकुमार साताळे माधव सोलापूरे ज्ञानेश्वर गायकवाड उत्तम बिरादार इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व पूर्ण गावातील नागरिक यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत
कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोणी ग्रामपंचायतनी केला "नाकाबंदी" रस्ता बंद