अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी वाहनधारकांवर देवणी पोलिसांची दबंग कारवाई

देवणी कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात संचारबंदी व कलाम144 लागू असताना विविध कामाचे बहाणे करून संचारबंदी व कलाम144 च्या कलमाचे उल्लंघन करणाऱ्या देवणी शहर व परिसरातील मोकाट सैराट फिरणाऱ्या दुचाकी वाहन चालकानांकायद्याचा भंग केल्या प्रकरणी महाराष्ट्र वाहन कायदा 207 अन्वये  देवणीचे पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली दबंग कारवाई करण्यात आली  या वर्षातील सर्वात मोठी कार्यवाही असून  सैराट पणे मोटारसायकल चालकांना चाप बसला आहे  दुचाकी वाहन धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली त्यामुळे पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांचे कोरोना नियंत्रणात सर्वधिक योगदान असल्याचे स्पष्ट दिसून येते