मराठवाडा विकास मंडळाला मुदतवाढ द्या जनता विकास परिषद उदगीर ची मागणी

 



मराठवाडा विकास मंडळाला मुदतवाढ द्या जनता विकास परिषद  उदगीर ची मागणी :17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनेकांनी हौतात्म्य पत्करून मराठवाडा मुक्त केला. मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात सामील झाला, पण स्वातंत्र्योत्तर काळातही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झाला नाही मराठवाड्याला कुठलीच गोष्ट संघर्षा विना मिळालेली नाही . मराठवाड्याच्या अनेक क्षेत्रात अनुशेष व मागासलेपणा संपविण्यासाठी वैधानिक विकास मंडळाची आवश्यकता आहे .त्या मंडळाची मुदत 30 एप्रिल 2020 रोजी संपत आहे .प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी  नियोजनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका असलेले मराठवाडा विकास मंडळ बंद होणार नाही याची दक्षता घेऊन मुदतवाढ देण्यात यावी आणि मराठवाड्यातील जनतेला योग्यवेळी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येईल याची कृपया गंभीरपणे व तातडीने नोंद घ्यावी  अशी विनंतीही त्याने पाठवलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह को शियारी, पालकमंत्री ना. अमित देशमुख, पाणीपुरवठा व पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे ,मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबाद चे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे यांना केली आहे.