लोणी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांना मास्क व सेनीटायझर चे वाटप

*लोणी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांना मास्क व शानीटायझर चे वाटप*
उदगीर (प्रतिनिधी) लोणी तालुका उदगीर येथे हे कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय म्हणून पोलीस उपअधीक्षक जवळकर व पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या हस्ते मास्क व श्यानिटीझरचे वाटप करण्यात आले.कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक उपाययोजना ग्रामपंचायतच्या वतीने राबवण्यात आल्या आहेत गावामध्ये फवारणी करण्यात आली गावाच्या बाहेर नाकाबंदी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने वाहनाची व्यवस्था करून घरोघरी स्वस्त धान्य वाटप करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून लोकांना मास्क ची आवश्यकता होते म्हणून प्रत्येक घरोघरी जेवढे माणसे आहेत तेवढे मास्क व एक श्यानीटायझर ची बॉटल वाटप करण्यात आली. या वाटपाची सुरुवात उदगीरचे उपअधीक्षक मधुकर जवळकर व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या हस्ते वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आणि  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांन मार्फत  श्यानीटायझर ची बॉटल व मास्क चे वाटप करण्यात आले यासाठी लोणी चे सरपंच माधव पाटील उपसरपंच सोपान फड ग्राम विकास अधिकारी बब्रुवान पाटील मुख्याध्यापक संजय वाघमारे ग्रामपंचायत सदस्य गणेश पटवारी गनिमीया शेख नर्सिंग कांबळे,सतिश पाटील, तिरूपती साताळे, दिलीप गुलफुरे, अशोक भुजबळ, पूरनदास उदासी, ज्ञानोबा लोणीकर,अतुल पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी माधव सोलापुरे,गणपत केंद्रे,ज्ञानेश्वर गायकवाड, दत्ता बिरादार,तसेच गावातील नागरिक उपस्थिती होते.