उदगीर :5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 44 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. अहमदपूर येथुन 11 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी 06 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. निलंगा येथून 5 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 5 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील 5 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण 110 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 93 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 11 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 6 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत