आता गय केली जाणार नाही : ना. बनसोडे

आता गय केली जाणार नाही : ना. बनसोडे


उदगीर : शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कोरोना संकटाला सक्तीने आवरावे लागणार आहे, त्यामुळेच प्रशानाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, यावेळी कोणाची गय केली जाणार नाही; असा इशारा ना. संजय बनसोडे यांनी दिला आहे. 


उदगीर शहरातील नागरिकांना प्रशासन सतत घरी बसण्याची विनंती करीत आहे, पण नागरिक ऐकत नाहीत. पोलीस व कोरोना वारीयर्सच्या विनंतीला मान देत नाहीत. त्यांच्या कामात अडथळे आणत आहेत, तेव्हा नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे, संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे. हे संकट आता सक्तीने आवरावे लागणार आहे. आपण याला वेळीच रोखले नाही, तर कोरोनाचा विळखा सर्वत्र पडणार आहे. तेव्हा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी घरी बसावे, काही कोरोना लक्षणे आढळली तर ताबडतोब प्रशासनाला कळवावे. आपल्या आजूबाजूला कोणाला काही त्रास होत असेल तर कळवा, आपण सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती ना.संजय बनसोडे यांनी केली आहे.