राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अधिकारी /कर्मचारी यांचे नियमित शासन सेवेमध्ये संमावेश करण्यासाठी जीबी मध्ये ठराव घेणार* --- राहुल केंद्रे

*राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अधिकारी /कर्मचारी यांचे नियमित शासन सेवेमध्ये संमावेश करण्यासाठी जीबी मध्ये ठराव घेणार* ---


जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे


लातूर प्रतिनिधी -----


 राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अधिकारी कर्मचारी हे सद्यस्थितीत कोरोना यां महामारी च्या लढाईत सर्वजण प्राणपणाने लढत आहेत . अशा परिस्थितीतही पंधरा पंधरा तास सेवा देऊन कार्यरत आहेत रुग्णालयातील रिक्त पदांमुळे प्रचलित कर्मचाऱ्यांवर येत असलेल्या तणावामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यावर प्रचंड कामाचे प्रेशर असून *राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी याना शासन सेवेमध्ये नियमित करण्यात येणे साठी लातूर जिल्हा परिषदच्या जीबी मध्ये लवकरच ठराव घेणार* असल्याचेही राहुल केंद्रे यांनी म्हटले आहे.


 


 


 राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अधिकारी-कर्मचारी हे प्रशासनात गेल्या पंधरा वर्षापासूनअत्यंत उत्कृष्ट काम करत असून त्यांच्या कामाची दखल घेऊन यापूर्वी राज्य शासनाने जसे मस्टर कारकून, अंशकालीन कर्मचारी, बंधपत्रित आरोग्य परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, आमदार निवास कर्मचारी, त्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अधिकारी /कर्मचारी यांचे समायोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जीबी मध्ये ठराव घेण्यात येणार असून तशी शिफारस शासनाकडे लवकरच करण्यात येणार आहे.


 


असे आश्वासन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिले आहे