उदगीर मार्केट लवकरच सुरु होणार


माननीय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत दिनांक 14 मे 2020 रोजी च्या फेसबुक लाईव्ह
कार्यक्रमातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत
*गोलाई – मार्केट आतमध्ये वाहन घेऊन जाता येणार नाही, पार्कींगची सोय आण्णाभाऊ साठे चौक, बस स्टँन्ड ,गांधी मार्केट येथे करण्यात येणार , वाहन आणल्यास जप्त.
*फुट वेअर, कापड लाईन, सराफ लाईन या ठिकाणी हात गाडी  अनाधिकृतपणे थांबता येणार नाही. याचे नियोजन करण्यात आले आहे.
*वयोवृध्द  व्यक्तीस दुकानामध्ये घेऊ नये. तसेच दुकानदार व व्यवसायिक यांनी त्यांच्या घरातील वयोवृद्ध व्यक्ती लहान मुलांना दुकानांमध्ये आणू नये.
* मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांना डॉक्टर्स ना वैयक्तिक भेटी देता येणार नाहीत
*लातूर शहरामध्ये 1 ही कोरोना बाधित रुग्ण् नाही याचे श्रेय सर्वांचे.
*परप्रांतिय मजुराची ही व्यवस्था त्यांच्या राज्यात व्यवस्था होईलच असे नाही, त्यामुळे मजुरानी इथेच रहावे.ज्यांची इच्छा इथे राहण्याची नाही त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
*उदगीर मार्केट लवकरच सुरु  होणार
*वाईन शॉप बाबत – Home Delvari / पार्सल सुविधा देण्यात येणार, दुकाने उघडता येणार नाहीत
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधिकृत माहिती देण्यात येईल. अधिकृत परवानाधारक व्यक्तिस दारु विक्री होणार
*कोरोना बाधीत व्यक्ति बाबत संपुर्ण जबाबदारी घेऊन शासनाच्या नियमावली नुसार आरोग्य यंत्रणेचे कार्य सुरु 
*समाजाने कोरोना बाधीत रुग्णांना वाईट नजरेने बघू नये, त्यांना सामाजिक बांधिलकी नुसार जास्तीत जास्त मदत करा.
*समुपदेशक मार्फत क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तिला वारंवार समुपदेशन करण्यात येत आहे.
*भाडेकरु सोबत वाईट भुमिका न घेता मदतीची भुमिका मालकांनी घ्यावी.
*टु व्हीलर वरुन दुरच्या ठिकाणाकडून नागरिकांनी  येऊ नये, ते धोक्याचे होऊ शकते.